Share Market Today: भारतीय शेअर बाजाराने आज 2 एप्रिल रोजी संमिश्र कल दाखवला. सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह आणि लाल रंगात बंद झाले. दुसरीकडे लहान आणि मध्यम समभागांमध्ये जोरदार खरेदी दिसून आली. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक 1.14 टक्क्यांच्या वाढीसह आणि स्मॉलकॅप निर्देशांक 1.28 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या संपत्तीत आज सुमारे 2.52 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. आयटी आणि बँकिंग वगळता बीएसईचे सर्व क्षेत्रीय निर्देशांक आज हिरव्या रंगात बंद झाले.
व्यवहाराच्या शेवटी, BSE सेन्सेक्स 110.64 अंकांनी किंवा 0.15% घसरून 73,903.91 वर बंद झाला. NSE चा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 8.70 अंक किंवा 0.039% घसरला आणि 22,453.30 वर बंद झाला.
गुंतवणूकदारांनी कमावले ₹2.52 लाख कोटी –
BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 1 एप्रिल रोजी 395.67 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे सोमवार, 1 एप्रिल रोजी 393.15 लाख कोटी रुपये होते. अशा प्रकारे, BSE मध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 2.52 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 2.52 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
सेन्सेक्सचे 5 सर्वाधिक वाढणारे समभाग –
बीएसई सेन्सेक्समधील 30 पैकी 14 शेअर्स आज वाढीसह बंद झाले. यामध्येही महिंद्रा अँड महिंद्रा (M&M) च्या शेअर्समध्ये सर्वाधिक 2.95% वाढ झाली. यानंतर Nestlé India 1.42%, Tata Motors 1.23%, IndusInd Bank 1.11 आणि State Bank of India (SBI) चे शेअर्स 1.21 % सर्वाधिक वाढीसह बंद झाले.
सेन्सेक्सचे सर्वाधिक घसरलेले 5 समभाग –
सेन्सेक्समधील केवळ 16 समभाग आज तोट्यासह बंद झाले. त्यातही कोटक महिंद्रा बँकेचे समभाग 1.84 टक्क्यांच्या घसरणीसह सर्वाधिक घसरले. तर एचसीएल टेक 1.82%, आयसीआयसीआय बँक 1.52%, सन फार्मा 0.90% आणि इन्फोसिसचे शेअर्स 0.84 % घसरणीसह लाल रंगात बंद झाले.
खालील चित्रात तुम्ही इतर सेन्सेक्स समभागांची स्थिती पाहू शकता-
2,840 समभागांमध्ये वाढ झाली –
बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर आज वाढीसह बंद होणाऱ्या समभागांची संख्या जास्त होती. एक्सचेंजमध्ये आज एकूण 3,959 शेअर्सचे व्यवहार झाले. यातील 2,840 शेअर्स वाढीसह बंद झाले. 1,005 समभागांमध्ये घसरण दिसून आली. तर 107 समभाग कोणतेही चढउतार न होता फ्लॅट बंद झाले. याशिवाय आजच्या व्यवहारादरम्यान 174 समभागांनी त्यांच्या 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. तर 20 समभागांनी त्यांच्या नवीन 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीला स्पर्श केला.