अमित शहा यांच्या अरूणाचल दौऱ्याला चीनचा विरोध

अमित शहा यांच्या अरूणाचल दौऱ्याला चीनचा विरोध

बिजिंग : अरूणाचल प्रदेशच्या राज्य दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येथे दाखल झाले. मात्र, शहा यांच्या या कार्यक्रमातील सहभागाबाबत चीनने ठाम विरोध दर्शवला आहे. शहा यांच्या जाण्याने चीनच्या प्रादेशिक सार्वभौमत्वाचे उल्लंघन आहे. दोन्ही देशातील राजकीय विश्‍वासाचा घात आहे, असे चीनने म्हटले आहे.

शहा हे अरूणाचलच्या दौऱ्यावर आहेत. या अरूणाचल राज्य दिनाच्या कार्यक्रमात ते अनेक प्रकल्पांचे उद्‌घाटन करणार आहेत. नेहमीप्रमाणे या प्रदेशावरील आपल्या कथीत हक्कावर प्रकाशझोत टाकण्यासाठी भारतीय नेत्यांच्या अरूणाचल प्रदेशमधील दौऱ्याला चीन विरोध करत असते.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग म्हणाले, भारत चीन सीमेबाबत चीनची भूमिका कायम स्वरूपी एकच आणि ती ठाम आहे. चीनच्या बाजूने नेहमीच भारताला विनंती करण्यात येते की सीमावर्ती भागात कोणतीही आक्षेपार्ह कृती करू नये. त्यातून सीमावाद चिघळू शकतो. भारत आणि चीनमध्ये तीन हजार 488 किमीची सीमा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.