शिरूर- पंचायत समितीच्या माध्यमातून गरीब गरजू लाभार्थ्यांना जास्तीत जास्त घरे देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन शिरूर पंचायत समितीच्या सभापती मोनिका हरगुडे यांनी केले.
शिरसगाव काटा (ता.शिरुर) येथे घरकुल योजनेतील लाभार्थ्यांच्या आठ घरकुलांचा लोकार्पण सोहळा मोनिका हरगुडे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी पंचायत समिती सदस्य आबासो सरोदे, श्रीमती कोल्हे, विस्तार अधिकारी शिंदे, ग्रामविकास अधिकारी
मुरकुटे, ग्रा. प. सदस्या शैलजा माने, माजी सरपंच सतीश चव्हाण, रामचंद्र केदारी, घोडगंगेचे संचालक नरेंद्र माने, सोसायटीचे चेअरमन निखिल गायकवाड, तंटामुक्ती अध्यक्ष नंदकुमार कदम, विनायक जगताप, सुभाष गद्रे, आबासो कदम जहागिरदार, विकास जगताप, शरद जाधव, प्रकाश जाधव आदी उपस्थित होते. विजयसिंह नलावडे यांनी शिरसगाव काटा गावात केलेली विकासकामे पाहुन समाधान व्यक्त केले तर ग्रामस्थांनाही सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी सरपंच पल्लवी किरण जगताप यांच्या हस्ते सभापती हरगुडे व गटविकास अधिकारी विजयसिंह नलावडे यांचा सत्कार करण्यात आला. घरकुल लाभार्थ्यांच्या थेट घरी जाऊन मान्यवरांनी घराचे आठ अ उतारे दिल्याने कुटुंबांच्या डोळ्यात अश्रू तरळले.