बीजिंग – चीनमध्ये पुन्हा एकदा करोनाचा संसर्ग वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. देशभरात शुक्रवारी 10 हजार 729 नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर चीनची राजधानी असलेल्या बीजिंग शहरातील सर्व उद्याने पुन्हा बंद करण्यात आली असून करोनाचे काही निर्बंध लागू करण्यात आले आहे.
चोगकिंगचे आरोग्य अधिकारी ली पॅन यांनी सांगितले की, येथील रहिवाशांना आपापल्या ठिकाणी राहण्यास सांगितले आहे, त्यांना बाहेर जाण्याची परवानगी नाही. त्याचबरोबर जे बाहेरगावी आहेत, त्यांनी गरज असल्याशिवाय येथे येऊ नये, असेही सांगण्यात आले आहे. दक्षिण चीनमधील ग्वांगझू आणि पश्चिमेकडील चोंगकिंगमध्ये 5 लाखांहून अधिक नागरिक लॉकडाऊनमध्ये आहेत.
बीजिंग शहरात 21 लाख लोकांची दररोज करोना चाचणी करण्यात येत आहे. यात शुक्रवारी आणखी 118 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यामुळे शहरातील अनेक शाळांना ऑनलाइन वर्ग घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Meta Layoffs : चांगली नोकरी सोडून Meta जॉईन केले, मात्र दोनच दिवसात कंपनीने दाखवला बाहेरचा रस्ता
याशिवाय दुकाने आणि रेस्टॉरंट्स बंद करण्यात आली असून कर्मचाऱ्यांना विलगीकरण्यात ठेवण्यात आले आहे. दरम्यान, सोशल मीडियावरील व्हिडिओमध्ये काही भागातील लोक पोलीस आणि प्रशासनाविरोधात निदर्शने करताना दिसत आहे.