पुणे – टीजीएच ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर कर्करोगांना संजीवनी देणारे ठरेल, असा विश्वास विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केला. कर्करोगाशी लढा देण्याची वेळ कोणावर येऊ नये, हीच प्रार्थना. परंतु अशी वेळ आल्यास अत्याधुनिक रुग्णालयातील उपकरणे आणि तज्ज्ञ डॉक्टर यांच्यामुळे प्रथम स्तरावर निदान होऊन कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो, असे पवार यांनी सांगितले.
टीजीएच ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरचे पाचवे रुग्णालय पुण्यातील तळेगाव येथे सुरू झाले आहे. या रुग्णालयाचे उद्घाटन माजी उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते आणि तळेगाव जनरल हॉस्पिटलचे माजी अध्यक्ष कृष्णराव भेगडे यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी आमदार सुनील शेळके, तळेगाव जनरल हॉस्पिटलचे अध्यक्ष गणेश खांडगे, सभापती शैलेश शहा, डॉ. सत्यजित वढोकर, रामदास काकडे, ऑन्को लाईफ होस्पिटल्सचे अध्यक्ष डॉ. उदय देशमुख, कार्यकारी संचालक सचिन देशमुख, संचालक डॉ. प्रताप राजेमहाडिक उपस्थित होते.
आशिया खंडातील तिसरे आणि महाराष्ट्रातील पहिले अद्ययावत तंत्रज्ञान असलेले टोमोथेरेपी विथ सिंक्रोनी रेडीएएशन मशीन यांसह अद्ययावत उपकरणे रुग्णालयात आहेत, याचे कौतुक अजित पवार यांनी केले.
मी पळून जाणारा माणूस नाही, कोणत्याही गोष्टीला सामोरा जातो – अजित पवार
ते म्हणाले, या रुग्णालयाचा समावेश महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले योजनेत करावा, यासाठी मी सरकारदरबारी पाठपुरावा करेन. कर्करोगग्रस्त रुग्णावर प्रभावी आणि किफायतशीर दरात उपचार करणारे रुग्णालय म्हणून ऑन्को लाईफ कॅंन्सर सेंटर प्रसिद्ध आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात कर्करोग रुग्णासाठी प्रभावी सेवा दिल्यानंतर आता पुण्यातील सेवेसाठी सज्ज झाले आहे.