बीजिंग – चीनमध्ये आणखीन 10 मोठ्या शहरांमधील करोना संबंधी निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. यामध्ये गुआंगदोंग प्रांतातील शेन्झेन या मॅन्युफॅक्चरिंग हबचाही समावेश आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याच्या 48 तास अगोदर कोविड-19 चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट प्रवाशांकडे असण्याची अनिवार्यता आता हटवण्यात आली आहे.
शेन्झेन व्यतिरिक्त चेंगडू, तियान्जीन, दालियन आणि शिजियांजुआंग यासारख्या काही शहरांमध्ये हा टेस्टचा निगेटिव्ह रिपोर्ट प्रवासांना जवळ बाळगण्याची सक्ती होती, ती आता असणार नाही. हा 48 तासांपूर्वीचा चाचणी रिपोर्ट जवळ नसेल तर आता प्रवाशांना बस आणि भुयारी मार्गांमध्ये प्रवेश नाकारला जाऊ नये, असे चीनमधील अधिकाऱ्यांनी सूचित केले आहे.
औषध विक्री, उद्याने आणि पर्यटन स्थळांच्या ठिकाणीही जाण्यासाठीही ही चाचणी झाल्याचा पुरावा बाळगणे आवश्यक होते. मात्र या ठिकाणी जाण्यासाठी व्हेन्यू कोड स्कॅन करून आपल्या आरोग्याशी संधित “ग्रीन हेल्थ कोड’ उपलब्ध करून देणे आवश्यक असणार आहे.
Russia : रशियाच्या कॅप्सियन किनाऱ्याजवळ 1,700 सील आढळले मृतावस्थेमध्ये
चीनमध्ये अजूनही सर्दी, खोकला, तापाची लक्षणे असणाऱ्या सामान्य रुग्णांची संख्या दररोज वाढते आहे. चाचण्यांच्या माध्यमातून कोविड रुग्णांच्या संख्येवर शिक्कामोर्तब देखील होते आहे. करोनाची साथ अजून आटोक्यात आलेली नसताना केवळ आंदोलन कमी होण्याच्या आशेने प्रशासनाने निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे.