बालमृत्यू प्रकरण : १७ दिवसानंतर नितीश कुमार रुग्णालयात; लोकांची सरकारविरोधात घोषणाबाजी 

पाटणा – बिहारमध्ये सध्या ‘चमकी’ (ऍक्यूट एन्सेफलायटीस सिंड्रोम) तापाने थैमान घातले असून या जीवघेण्या आजाराने आतापर्यंत राज्यातील जवळपास १०८ बालकांचा बळी घेतला आहे. बिहारमधील रुग्णालयांमध्ये चमकी तापाच्या आणखी अनेक बालरुग्णांवर उपचार सुरु असून सध्या राज्यात ही साथ वेगाने पसरत आहे. आज बिहार मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी रुग्णालयाला भेट दिली आहे. यावेळी रुग्णांच्या नातेवाईकांनी नितीश कुमार यांना काळे झेंडे दाखवीत ‘नीतीश कुमार वापस जाओ’च्या घोषणा दिल्या.

नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी १७ दिवसानंतर रुग्ण बालकांना भेट दिली. मुलांच्या आई-वडिलांना भेटत प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी रुग्णालयाच्या परिसरात कडेकोट  बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, चमकी तापाप्रकरणी राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाने बिहार सरकारला व केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाला नोटीस बजावली असून या आजारामुळे मृत्यू झालेल्या बालकांबाबतचा सखोल अहवाल केंद्रीय मानव अधिकार आयोगाकडे चार आठवड्यांच्या कालावधीमध्ये सादर करावा असे निर्देश देण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)