#SacredGamesS2: ऑगस्ट महिन्यात येणार प्रेक्षकांच्या भेटीस

नेटफ्लिक्सने सेक्रेड गेम्स सीझन 2 ट्रेलर प्रदर्शित सोशल मीडियावर प्रदर्शित केला आहे. कल्कि कोचलिन, रणवीर शोरी यांचा समावेश आहे. सेक्रेड गेम्सच्या पहिल्या हंगामाने चाहत्यांना अक्षरक्षा प्रेमात पाडले. नेटफ्लिक्सने प्रदर्शित केलेल्या २६ सेकंदाच्या ट्रेलर मध्ये कलाकारांचे नवीन लूक दाखवले आहे. या वेबसिरीजच्या दुसऱ्या भागासाठी चाहते आतुरतेने वाट बघत आहेत.

 

View this post on Instagram

 

Papas kehte hain bada naam karega. Ganesh humara aisa kaam karega. #HappyFathersDay

A post shared by Netflix India (@netflix_in) on

मात्र, सेक्रेड गेम्स २ ही वेबसिरिज सुरू व्हायला प्रेक्षकांना अजून काही दिवस तरी वाट पाहावी लागणार आहे. सैफ अली खान आणि नवाझुद्दीन सिद्दकी यांची मुख्य भूमिका असलेला सेक्रेड गेम्स या वेबसिरिजचा दुसरा भाग २८ मे ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार होता.


पण आता ही वेबसिरिज ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दोन प्रसिद्ध वेबसिरिजमध्ये काही महिन्यांचे अंतर असावे यासाठी हा बदल करण्यात आला आहे. ‘कभी कभी लगता है अपुनीच भगवान है’ गणेश गायतोंडेंचा हा फेमस डायलॉग पुन्हा कधी ऐकायला मिळतो. तसेच अनेक सस्पेन्स ठेऊन गेलेली ही वेबसिरीज सस्पेन्स उलगडणार का?, असे अनके प्रश्न चाहत्यांच्या मनात आहेत.

 

View this post on Instagram

 

Agar Sartaj ko system badalna hai, toh khel toh khelna hi padega.

A post shared by Netflix India (@netflix_in) on

Leave A Reply

Your email address will not be published.