पवारांच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्र्याची तोफ धडाडणार

मुख्यमंत्र्याची गुरुवारी तर चंद्रकांत पाटलांची शुक्रवारी सभा

बारामती- पवारांच्या बाल्लेकिल्ला असलेल्या बारामतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील या दोघांच्याही तोफ धडाडणार आहे. मुख्यमंत्र्यांची ग्रामीण भागात माळेगाव येथे गुरुवारी (दि. 17) तर चंद्रकांत पाटील यांची बारामती शहरात शुक्रवारी (दि. 18) सभा होणार आहे.

भाजपचे बारामतीचे विधानसभेचे उमेदवार गोपीचंद पडळकर, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे, रंजन तावरे ,चंद्रराव तावरे, अविनाश मोटे, पांडुरंग कचरे आदींनी मंगळवारी (दि. 15) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

मुख्यमंत्री गुरुवारी सकाळी 10 वाजता माळेगाव येथील इंग्लिश मीडियम शेजारी मैदानावर सभा घेणार आहेत. नीरा डावा कालव्याचे पाणी, जिरायत भागातील टॅंकरचा प्रश्‍न तसेच सहकारी साखर कारखान्यांना लावलेला आयकर याप्रश्‍नी मुख्यमंत्री काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे. तर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे शुक्रवार दुपारी चार वाजता बारामती शहरातील भिगवण चौकातील शारदा प्रांगण येथे सभेला मार्गदर्शन करतील.

Leave A Reply

Your email address will not be published.