विकासात्मक इंदापूर निर्माणासाठी साथ द्या

हर्षवर्धन पाटील यांनी मतदारांना घातली साद

रेडा- इंदापूर शहराचा चेहरा-मोहरा आपल्या माध्यमातून बदलत आहे. आगामी काळात आदर्श विकासात्मक इंदापूर शहर निर्माण करण्यासाठी इतिहासात नोंद होईल, असा विक्रम कमळ चिन्हाला मतदान देऊन करा, असे आवाहन हर्षवर्धन पाटील यांनी केले.

इंदापूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे भाजपचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचार सभेसाठी इंदापूर शहरातील दर्गा मश्‍जीद येथे आयोजित केलेल्या प्रचार सभेमध्ये ते बोलत होते. यावेळी ऍड. कृष्णाजी यादव, भरत शहा, अशोक इजगुडे, मुकुंद शहा, विशाल बोंद्रे, माऊली वाघमोडे, संदिपान कळवळे, माऊली चवरे, नानासाहेब शेंडे, शेखर पाटील,बापू जामदार, धनंजय पाटील, रघुनाथ राऊत, गुड्डू मोमीन, जगदीश मोहिते, अफसर मोमीन,पांडुरंग शिंदे, कैलास कदम,आसिफ बागवान, शकील सय्यद, संदिपान कडवळे, महादेव सोमवंशी उपस्थित होते.

हर्षवर्धन पाटील म्हणाले की, शहराच्या मतदानामध्ये इतिहास घडविण्याचे काम आपण करावे. या पाच वर्षांत शेतीला पाणी मिळाले नाही. ज्या शहराने त्यांना मताधिक्‍य दिले त्यांनी एक तरी विकासाचे काम केले का, ते दाखवावे. या शहरात त्यांनी संस्था काढली का, की तालुक्‍यात एखादा प्रकल्प सुरू केला आहे का, नवीन योजना सुरू केली आहे का हे त्यांनी सांगावे.

Leave A Reply

Your email address will not be published.