मुख्यमंत्र्यांची भाजप नेत्याला मान कापण्याची धमकी

चंदिगढ: निवडणुकांच्या अनुषंगाने हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी जनआशीर्वाद यात्रा काढली आहे. या यात्रे मधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत हातात कुऱ्हाड घेतलेले खट्टर स्वपक्षीय नेत्याला धमकी देताना दिसत असल्याने खट्टर चांगलेच वादात सापडले आहेत.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओत खट्टर एका गाडीवर उभे राहिलेले असून, त्यांच्या हातात एक कुऱ्हाड आहे. यावेळी  खट्टर कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते. “कुऱ्हाड शत्रूचा नाश करण्यासाठी असते”, असं म्हणत असताना मागे असलेल्या एका भाजपा नेत्यानं खट्टर यांना पारंपारिक टोपी घालण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. परंतु खट्टर यांना ही गोष्ट न आवडल्यानं ते संतापतात आणि त्यांच्याच पक्षातील नेत्याला मान कापण्याची धमकी देतात.

दरम्यान या व्हिडीओ वरून काँग्रेसचे वरिष्ठ नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी खट्टर यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘राग आणि अहंकार आरोग्यासाठी हानीकारक असतो. खट्टर साहेबांना राग का येतो? कुऱ्हाड घेऊन त्यांच्याच नेत्याला म्हणतात, मान कापून टाकेन. मग जनतेसोबत काय करतील?’, असं ट्विट करत सुरजेवाल यांनी खट्टर यांना लक्ष्य केलं आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)