कर्नाल (हरियाणा) – हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात आयोजित केलेल्या बैठकीबाहेर निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी बेछुट लाठीमार केला ( Hariyana Farmer ) . त्यात अनेक शेतकरी गंभीर जखमी झाले. अनेकांची डोकी फुटल्याची छायाचित्रे समाजमाध्यमांत व्हायरल झाली आहेत. या घटनेने देशांत संतापाची लाट उसळली आहे.
कर्नालमध्ये शेतकऱ्यांनी निदर्शने करत राष्ट्रीय महामार्ग रोखला. त्यावेळी पोलिसांनी बळाचा वापर केला. बस्तर टोल प्लाझावर आंदोलक पोहोचले. त्यावेळी तणावाला सुरवात झाली. शेतकरी नेत्यांनी हरियाणा आणि आजूबाजूच्या राज्यांत राष्ट्रीय महामार्ग रोखून धरण्याची सूचना शेतकऱ्यांच्या केंद्रीय नेत्यांनी केली होती. शेतकरी नेते नव्या कृषी कायद्याविरोधात गेल्या नऊ महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. ( Hariyana Police Lathicharge )
अगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी पक्षाची भूमिका ठरवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने शनिवारी बैठक आयोजित केली होती. कर्नालमधील प्रेम प्लाझा हॉटेलमध्ये ही बैठक होणार होती. शेतकऱ्यांनी तेथे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथे जाण्यापासून त्यांना रोखण्यात आल्यानंतर शेतकऱ्यांनी बस्तर टोल प्लाझावर महामार्ग रोखला. ( Hariyana Police Lathicharge )
निदर्शकांनी भाजपा नेत्यांना काळे झेंडे दाखवले. त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रचंड प्रमाणात पोलीस बंदोबस्त असल्याने त कोणतेही वाहन अडवू शकले नाहीत. मात्र त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. ( Hariyana Farmer )
The next time people go out to vote, they must remember how Modi and his Minions beat Farmers mercilessly for protesting peacefully. pic.twitter.com/pgrKpDmNGl
— Srivatsa (@srivatsayb) August 28, 2021