एन. चंद्राबाबू नायडू मुलासह घरातच नजरकैदेत

विजयवाडा : गुंटूर येथे सभेस जाण्याच्या तयारीत असणारे तेलगू देसमचे नेते एन. चंद्राबाबू नायडू यांना मुलासह घरातच नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.

गुंटूर जिल्ह्यातील पलांडू भागात तणाव निर्माण होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये म्हणून नायडू यांना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ताब्यात घेतल्याचे आंध्र प्रदेशचे पोलिस महासंचालक डी गौतम सवंग यांनी निवेदनात म्हटले आहे.

कृष्णा जिल्हा पोलिसांनी नायडू यांच्या उंडवली येथील निवासस्थानाला टाळे ठोकून घराबाहेर पडण्यास मज्जाव केला. नायडू यांचा दुसऱ्या वाहनातूनप्रवास करणारा पूत्र लोकेश याला ताब्यात घेऊन त्याला घारत परत पाठवण्यात आले. तेलगू देसमचे अनेक नेते आणि कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली.

घराबाहेरील पत्रकारांशी बोलताना नायडू म्हणाले, तेलगू देसमच्या कार्यकर्त्यांवर हल्ल्याच्या 500 पेक्षा अधिक घटना गेल्या 100 दिवसांत घडल्या आहेत.हे सरकार मानवी आणि मूलभूत हक्कामचे उल्लंघन करत आहे. नागरिकांचे संरक्षण करण्यात हे सरकार अपयशी ठेले आहे. मागास जातीच्या किमान 125 जणांनी वायएसआर कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या भतिीने स्थलांतर केले आहे. माझी नजरकैदेतून सुटका झाल्यावर मी अतमकूर भागात जाईन.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)