मुंबई – असे आश्वासनही दिले. राज्यात प्राथमिक शिक्षणात अमुलाग्र परिवर्तन घडवून आणण्यासाठी राज्य सरकारने एक टास्क फोर्स तयार केला आहे. त्याच्या माध्यमातून आता “डिसले पॅटर्न’ राज्यभर राबविण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. तसेच डिसले यांच्या कामाचे कौतुक करत त्यांना राज्य सरकार पूर्ण मदत करण्यात येईल, असे आश्वासनही दिले.
युनेस्को व लंडनस्थित वार्की फाऊंडेशनचा “ग्लोबल टीचर’ पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सोलापूरमधील जिल्हा परिषदेचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांचे जगभरात कौतुक होत आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रणजितसिंह महादेव डिसले यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, परिवहन मंत्री ऍड. अनिल परब, मुख्य सचिव संजय कुमार व अजोय मेहता यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्यातल्या काना कोपऱ्यात हा प्रयोग घेऊन जाणार असल्याची इच्छा डिसले यांनी व्यक्त केली. राज्यात असे अनेक शिक्षक निर्माण झाले पाहिजेत, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्रात क्यूआर कोडची सुविधा सर्वांत आधी रणजित यांनी सुरु केली. याचबरोबर 2017 मध्ये महाराष्ट्र सरकारला देखील त्यांनी या पद्धतीने सर्व सिलॅबस जोडण्याचा सल्ला दिला होता. सुरुवातीला प्रायोगिक स्तरावर त्यांचा हा प्रस्ताव स्वीकारण्यात आला. त्यानंतर आता सरकारने सर्व श्रेणीच्या विद्यार्थ्यांमधे राज्य सरकार क्यूआर कोडची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. एनसीईआरटीनेदेखील याची घोषणा केली आहे.