प्रदीप गारटकर ः पुणे जिल्ह्यात फिरकू न देण्याचा राष्ट्रवादीकडून इशारा
इंदापूर – महाराष्ट्राला राजकारणाची आदर्श संस्कृती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आव्हान आहे की, त्यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल त्यांचे मंत्री पद काढून घ्यावे. राज्यातील जनतेला आदर्श राजकारणाची परंपरा दाखवून द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी केली.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी इंदापूर तालुका यांच्या वतीने मंगळवारी (दि. 8) मंत्री अब्दुल सत्तार यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केले. यावेळी इंदापूर नगरपरिषद ते इंदापूर पोलीस ठाण्यापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला. यामध्ये मंत्री सत्तार यांच्या विरोधात, अब्दुल सत्तार गद्दार, गद्दार! अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे, अशा घोषणा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे कार्यकर्ते व नागरिक देत होते.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, हनुमंत बंडगर, दत्तात्रय घोगरे, सचिन सपकळ, सागर मिसाळ, प्रशांत पाटील, बापूराव शेंडे, तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, कार्याध्यक्ष अतुल झगडे, युवक तालुका अध्यक्ष ऍड. शुभम निंबाळकर, कार्याध्यक्ष सचिन खामगळ, बाळासाहेब ढवळे, सचिन देवकर, अण्णासाहेब धोत्रे,
संग्रामसिंह पाटील, राजेंद्र पवार, बाळासाहेब व्यवहारे, दिलीप वाघमारे, रमेश पाटील, अमर गाडे, अनिकेत वाघ, दादा सोनवणे, संजय सोनवणे, सचिन चव्हाण, महिला तालुकाध्यक्षा छायाताई पडसळकर, शहराध्यक्ष उमा इंगोले, स्मिता पवार, उज्वला परदेशी, सुनीता भोसले, रुपाली नगरे, मंगल ढोले, मीना ढोले, श्रीधर बाब्रस यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.