कोलकाता – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना त्यांच्या डावा गुडघा आणि खांद्याच्या नियमित तपासणीसाठी येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या वर्षाच्या सुरुवातीला हेलिकॉप्टरमधून उतरताना त्यांना दुखापत झाली होती.
एसएसकेएम हॉस्पिटलच्या वुडबर्न ब्लॉकमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आले. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या की, आमच्या हेलिकॉप्टरला आयएएफ हेलिपॅडवर (सिलीगुडीजवळ) इमर्जन्सी लँडिंग करावे लागले तेव्हा माझ्या पायाला आणि खांद्यावर दुखापत झाली.
पण आज डॉक्टरांनी यावर पूर्ण उपचार केले आणि आता मी पूर्णपणे बरी आहे,असे त्या म्हणाल्या. त्या म्हणाल्या की मी येथे केवळ तपासणीसाठी आले आहे. मी आता सामान्यपणे चालू लागले असून मी दररोज २० हजार पावले चालते असेही त्यांनी नमूद केले. सप्टेंबरमध्ये स्पेन आणि दुबईच्या १२ दिवसांच्या दौऱ्यात त्यांच्या डाव्या गुडघ्याला पुन्हा दुखापत झाली होती.