मुंबई – मुंबईतील बीडीडी चाळीतील पोलिसांना 15 लाखांत घरं देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मागील अनेक वर्षांपासून पोलिसांच्या निवासस्थानाचा प्रश्न प्रलंबित आहे. बीडीडी चाळीत राहणाऱ्या पोलिसांच्या घरांची अवस्था फार बिकट आहे. याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी बीडीडी चाळीत राहणाऱ्या पोलिसांना किफायतशीर दरात घरे देण्याचे जाहीर केले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल(बुधवार) बीडीडी चाळीत वास्तव्य करणाऱ्या पोलिसांना नाममात्र दरात घरे देणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आज मुख्यमंत्र्यांनी घराची किंमतच जाहीर केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात काही महत्वाचे निर्णय घेतले होते. त्यामुळे यामध्ये आणखी काही चांगले निर्णय घेता येतील का हेदेखील पाहणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.