मुंबई – मराठवाड्याचा मुक्ती संग्राम नव्या पिढीसमोर सचित्र यावा अशी संकल्पना राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडली होती, ती आज पूर्ण झाली. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ निर्मित ‘मराठवाडा मुक्तीसंग्राम’ (Mukti Sangram: The Story of the Marathwada Struggle) या नाट्य माहितीपटाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde) यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथे आज झाला.
यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (Deputy Chief Minister Ajitdada Pawar), सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Culture Minister Sudhir Mungantiwar) यांच्यासह मंत्रिमंडळातील मंत्री उपस्थित होते. यावेळी या नाट्य माहितीपटाचे मान्यवरांनी कौतुक केले.
राज्याच्या सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास मोठ्या पडद्यावर अशाप्रकारे पहिल्यादाच येत आहे. अगदी अल्प कालावधीत
कथा मराठवाड्याच्या संघर्षाची हा नाट्य माहितीपट तयार करण्यात आला आहे.
माहितीपटाची वैशिष्ट्ये
१. मुक्तिसंग्राम : कथा मराठवाड्याच्या संघर्षाची हा डॉक्यु ड्रामा प्रकार आहे. म्हणजेच उपलब्ध कागदपत्रे आणि नाट्यरूपांतर यांची योग्य पद्धतीने सांगड घालून तयार केलेला माहितीपट.
२. शिवराज अष्टकाचे जनक, फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड, शेर शिवराज आणि सुभेदार या सलग ५ वर्षात ५ सुपरहिट चित्रपटाचे लेखन,दिग्दर्शन करणारे दिग्पाल लांजेकर यांनी या माहितीपटाचे दिग्दर्शन केले आहे.
३. खालील उपलब्ध पुस्तके, संदर्भ यांचा सखोल अभ्यास करून संहिता लिहिली आहे.
सिलेक्टेड करस्पॉन्डन्स ऑफ सरदार वल्लभभाई पटेल, हैद्राबादचा स्वातंत्र्यसंग्राम आणि मराठवाडा.
४. ब्रिटिशकालीन वृत्तवाहिन्यांवरील मूळ उपलब्ध व्हिडिओंचा अभ्यास करून त्याचा योग्य पद्धतीने वापर केला आहे.
५. अजय पुरकर, समीर धर्माधिकारी, आदिनाथ कोठारे, समीर विद्वांस, विक्रम गायकवाड, स्मिता शेवाळे अशा मराठी चित्रपट सृष्टीतील मान्यवर कलाकारांनी या माहितीपटात भूमिका साकारली आहे.
६. केवळ १२ दिवसात हा ७५ मिनिटांचा माहितीपट तयार करण्यात आला आहे.
७. सावित्री ज्योती या माहितीपटासाठी पुरस्कार प्राप्त केदार दिवेकर यांनी या माहितीपटाचे संगीत दिग्दर्शन केले आहे.
८. फत्तेशिकस्त चित्रपटासाठी फिल्मफेअर मराठी पुरस्कार प्राप्त निखिल लांजेकर यांनी या माहितीपटाचे ध्वनी आरेखन केले आहे.
९. अनेक नावाजलेल्या हिंदी मराठी चित्रपटांसाठी कला दिग्दर्शक म्हणून काम केलेले प्रतीक रेडीज यांनी या माहितीपटातील नाट्यरूपांतरित भागाचे कला दिग्दर्शन केले आहे.