हैदराबाद – कॉंग्रेसने (Congress) एकत्रित निवडणुकांची (Election) संकल्पना अमान्य केली आहे. एक देश, एक निवडणूक (Election) हा प्रस्ताव राज्यघटना आणि संघराज्यीय रचनेवर घाला असल्याचे त्या पक्षाने म्हटले आहे.
कॉंग्रेसची (Congress) कार्यकारिणी बैठकीनंतर पत्रकार परिषद झाली. त्यामध्ये ज्येष्ठ नेते पी.चिदंबरम यांनी एकत्रित निवडणुकांविषयी (Election) पक्षाची भूमिका मांडली.
एकत्रित निवडणुका घेण्यासाठी किमान पाच घटनादुरूस्त्या कराव्या लागतील. त्यासाठी संसदेत आवश्यक संख्याबळ भाजपकडे नाही. त्याची जाणीव असूनही केवळ महत्वाच्या मुद्द्यांपासून लक्ष विचलित करण्यासाठी भाजपने मृगजळ पुढे केले आहे, असे त्यांनी म्हटले.
दरम्यान, कार्यकारिणी बैठकीत कॉंग्रेसने विविध ठराव मंजूर केले. त्याद्वारे संसदेच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्याची मागणी करण्यात आली. त्याशिवाय, विरोधी पक्षांनी एकत्र येऊन आघाडी (इंडिया) स्थापन करण्याच्या पाऊलाचेही स्वागत करण्यात आले.