सातारा – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 192 व्या जयंती सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. सातारा जिल्हा परिषद सातारा व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने जयंती सोहळ्याचे आयोजन नायगाव (ता. खंडाळा) येथे बुधवार, दि. 3 रोजी करण्यात आले आहे.
राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे व सहकार व इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे या कार्यक्रम सोहळ्याचे प्रमुख अतिथी आहेत. या जयंती सोहळ्याला खासदार श्रीनिवास पाटील, खासदार उदयनराजे भोसले, आमदार पृथ्वीराज चव्हाण, माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजीत सिंह निंबाळकर, विधान परिषद सदस्य शशिकांत शिंदे, आमदार रामराजे नाईक निंबाळकर, पदवीधर मतदारसंघाचे आमदार महादेव जानकर,
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, शिक्षक मतदारसंघाचे आमदार जयंत आजगावकर, आमदार शिवेंद्रसिंगराजे भोसले,आमदार बाळासाहेब पाटील, आमदार जयकुमार गोरे, आमदार मकरंद पाटील, आमदार महेश शिंदे ,आमदार दीपक चव्हाण, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलीस अधीक्षक समीर शेख इत्यादी मान्यवर या जयंती सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. सावित्रीबाई फुले जयंती सोहळ्याला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, खंडाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल वाघमारे व नायगावच्या सरपंच साधना नेवसे यांनी केले आहे.