नवी दिल्ली – राजस्थान सरकारसाठी आजचा शुक्रवार हा अत्यंत आव्हानात्मक दिवस होता. सीएम अशोक गेहलोत यांच्याकडून निवडणुकीचा अर्थसंकल्प सादर करताना मोठा घोळ झाला. मुख्यमंत्र्यांनी गेल्या वर्षीचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर विरोधकांनी गदारोळ केला. विरोधकांचा गदारोळ पाहता सभापतींनी कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब केले.
राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेत राज्याचे बजेट जाहीर केले.मात्र या दरम्यान मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी जुने भाषण वाचून दाखवल्याने सभागृहात एकच गोंधळ उडाला. सुमारे आठ ते दहा मिनिटे मुख्यमंत्री जुने भाषण वाचत राहिल्याने विरोधकांनी गदारोळ केला. त्यानंतर सभागृहाचे कामकाज अर्थ्या तासासाठी तहकूब करण्यात आले.
काय झालं नेमकं
सीएम गेहलोत यांनी सकाळी 11 वाजता अर्थसंकल्पीय भाषण वाचण्यास सुरुवात केली. यादरम्यान अर्थसंकल्प वाचताना गेहलोत स्वतः अडकले. मनरेगाच्या 125 दिवसांच्या नागरी रोजगार हमी योजनेची माहिती अर्थसंकल्पात येताच मुख्यमंत्र्यांनी मागील अर्थसंकल्प वाचल्याचे लक्षात आले. मंत्री महेश जोशी यांनी मुख्यमंत्र्यांकडे जाऊन ही चूक सांगितली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी माफीही मागितली की चुका होतात. पण अर्थसंकल्पाच्या पेपरमध्ये जुने बजेट आलेच कसे, याचाही धक्का गेहलोत यांना बसला.
House proceedings resume in Rajasthan Legislative Assembly;
CM Ashok Gehlot presents budget 2023 after he says “I feel sorry, what happened was by mistake.”
The opposition alleged that CM read old budget at the start of the budget presentation pic.twitter.com/Gb6Tiae7Yt
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) February 10, 2023
अर्थसंकल्पातील या गोंधळानंतर आता विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. “मुख्यमंत्र्यांनी जुना अर्थसंकल्प वाचला, आता राजस्थानमध्येही बजेट देखील लीक..” विरोधी पक्षनेते सतीश पुनिया यांनी असे ट्विट केले आहे.