नवी दिल्ली : आयएनएक्स मिदिया भ्रष्टाचार प्रकरणात अटक झालेल्या माजी केंद्रीय मंत्री पी. चिसंबरम यांना जामीन देण्यास दिल्ली उच्च न्यायलयाने नकार दिला. त्यांना 21 ऑगस्ट रोजीॅ त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानातून अटक करण्यात आली होती. त्यांना 3 ऑक्टोबर पर्यंत तिहार कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.
चिमदबरम् हे माजी केंद्रीय गृहमंत्री, अर्थमंत्री होते. त्यांची समाजात पाळेमुळे खोलवर रुजली आहेत, हे मान्य केले तरी ते साक्षिदारांवर दबाव आणू शकतात, हे नजरेआड करता येणार नाही. त्यामुळे त्यांना जामीन देता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.
कायदा बनवणारे कायदा मोडत आहेत, असे सांगून सीबीआयच्या वकिलांनी जामीन देण्यास विरोध केला. तर चिदंबरम यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी आणि कपलि सिब्बल यांनी या गुन्ह्याचे स्वरूप फार गंभीर नाही. त्यामुळे त्यांना जामीन देण्याची विनंती केली.