मुंबई – बॉलीवूडचा दबंग सलमान खानचा शो ‘बिग बॉस 16’ सुरुवातीपासूनच चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. चाहत्यांच्या हृदयाचा प्राण असलेल्या ‘अब्दू रोजिक’ला काही दिवसांपूर्वी शोमधून बाहेर काढण्यात आले होते. अब्दूला बिग बॉसच्या घराला निरोप देताना पाहून त्याच्या सर्व चाहत्यांच्या डोळ्यात ओलावा आला होता. अब्दू बेघर झाल्याच्या वृत्ताने चाहत्यांना धक्का बसला असल्याचं पाहायला मिळालं. मात्र, आता पुन्हा एकदा सर्वांचा लाडका छोटा भाईजान म्हणजेच अब्दू रोजिकने घरात प्रवेश केला आहे.
बिग बाॅसचा या आठवड्याचा विकेंडचा वार धमाकेदार ठरला आहे. या आठवड्यामध्ये सलमान खान याने घरातील सदस्यांसोबतच प्रेक्षकांचे जबरदस्त मनोरंजन केले. सलमान खान याने प्रियंका चाैधरीचा क्लास देखील घेतला. विकेंडच्या वारमध्ये चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी बिग बाॅसच्या घरात अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख देखील दाखल झाले होते.
दरम्यान, कालच पुन्हा एकदा अब्दु बिग बॉसच्या घरात दाखल झाला आहे. शिव ठाकरे आणि अब्दु गळाभेट घेतात. यावेळी अब्दु शिवला लव्ह यू ब्रो म्हणताना दिसतो. अब्दुला बिग बाॅसच्या घरामध्ये परत एकदा पाहून त्याचे चाहते आणि घरातील सदस्य देखील आनंदी झाले आहेत.
अब्दु रोजिक हा बिग बॉस 16 चा सर्वात आवडता आणि लोकप्रिय स्पर्धक आहे. अब्दु रोजिक हा चाहत्यांच्या हृदयात वसलेला आहे. शोचा होस्ट सलमान खान देखील अब्दुला नेहमीच सपोर्ट करताना दिसतो. अब्दूसाठी चाहत्यांची क्रेझ अशी आहे की बरेच लोक बिग बॉस 16 फक्त छोटे भाईजानसाठी पाहत आहेत.