ठाणे – डोंबिवली उपनगरात एका पंधरा वर्षांच्या मुलीवर आठ महिने सतत सामूहिक बलात्कार केल्याच्या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी 33 जणांवर आरोपपत्र दाखल केले असून त्यात चार अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.
22 सप्टेंबर रोजी या प्रकरणात पोलिसांनी पहिला गुन्हा दाखल केला होता. हे आरोपपत्र 885 पानांचे आहे. त्यात 122 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.
या मुलीला 29 जानेवारी ते 22 सप्टेंबर या अवधीत डोंबिवलीसह, बदलापूर, मुरबाड, रबाळे इत्यादी ठिकाणी नेऊन बलात्कार करण्यात आला.
या 33 आरोपींपैकी चार अल्पवयीन मुले सध्या जामिनावर सुटली असून 29 आरोपी न्यायालयीत कोठडीत आहेत. सदर पीडित मुलगी अल्पवयीन असल्याने या आरोपींवर पोक्सो कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.