मुंबई – मुंबईतील कथित कोविड घोटाळा प्रकरणात (Covid scam case) अंमलबजावणी संचालनालयाने अर्थात ईडीने शुक्रवारी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे सहकारी आणि उद्योगपती सुजित पाटकर (industrialist Sujit Patkar) यांच्याविरुद्ध आरोपपत्र (Chargesheet) दाखल केले.
ईडीने मनी लॉंड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) विशेष न्यायाधीशांसमोर हे आरोपपत्र सादर केले आहे. या प्रकरणी सुजित पाटकर आणि आरोपी किशोर बिसुरे यांना ईडीने 19 जुलै रोजी अटक केली होती. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.