मुंबई – शिवसेनेचे नेते आनंदराव आडसुळ यांचा अटक पुर्व जामीन अर्ज मुंबई हायकोर्टाने फेटाळला आहे. ईडीने त्यांच्या विरोधात मनिलॉड्रिंगची केस दाखल केली आहे.
या संबंधात कोर्टाने म्हटले आहे की ईडीने या प्रकरणात आत्तापर्यंत जो तपास केला आहे त्याचा तपशील पाहिल्यानंतर आडसुळ यांना कोठडी देऊन त्यांची चौकशी करण्याची गरज असल्याने त्यांचा अटकपुर्व जामीन मंजुर करता येत नाही.
सिटी कोऑपरेटीव्ह बॅंकेच्या 980 कोटी रूपयांच्या घोटाळ्याचे हे प्रकरण आहे. या आधी आडसुळ यांनी आपल्या विरोधातील ईडीचा खटला रद्द बातल ठरवावा अशी मागणी करणारा अर्ज केला होता पण हायकोर्टाने तोही फेटाळून लावला आहे.
त्यानंतर आडसुळ यांनी मनिलॉंड्रिंग कायद्यान्वये स्थापन केलेल्या विषेश न्यायालयात अटकपुर्व जामीन अर्ज केला होता पण तोही फेटाळला गेल्याने त्यांनी हायकोर्टात धाव घेतली होती.