‘चेंज भाई’ करणार वाहतुकीसाठी मार्गदर्शन

पालखी काळासाठी पोलिसांकडून स्वतंत्र वेबपेज

पुणे – पालखी मार्गावर शहराच्या वाहतूक रचनेमध्ये बदल करण्यात आला आहे. या बदलांची माहिती देण्यासाठी पुणे पोलीस आणि वाहतूक शाखेच्या वतीने पुढाकार घेऊन “चेंज भाई’ नावाचे वेबपेज तयार करण्यात आले आहे.

पोलीस आयुक्तांनी याबद्दल “ट्‌विटर’वर नागरिकांना नव्या वेबपेजबद्दल माहिती देत वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन केले.

संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्याकरिता आणि वाहतूक सुरक्षित, सुरळीतपणे सुरू राहण्यासाठी वाहतूक विभागाकडून वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.

यामध्ये अग्निशमन दल, रुग्णवाहिका, पोलीस वाहने आदी अत्यावश्‍यक सेवेतील वाहनांशिवाय सर्व वाहनांना पालखी मार्गावरील नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे वाहतूक विभागाच्या सांगण्यात आले.

नागरिकांची वाहतुकीबाबत अपेक्षित माहिती त्वरित मिळावी अशी अनेक दिवसांपासून अपेक्षा होती. या वेबपेजद्वारे नागरिकांना “लोकेशन’सह माहिती मोबाईल, लॅपटॉपवर पाहता येणार आहे. वाहतुकीचे बदललेले मार्ग, बंद याबाबत सर्व माहिती एका क्‍लिकवर मिळणार आहे.
– पंकज देशमुख, पोलीस उपायुक्‍त, वाहतूक.

“चेंजभाई’वर दिसणार हे “पॉइंटस’
– संत तुकाराम महाराज पालखी मार्ग
– संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी मार्ग
– वाहतूक वळविलेले मार्ग
– पालखी मुक्कामाची ठिकाणे
– पालखी प्रस्थानाचा अपेक्षित वेळ

Leave A Reply

Your email address will not be published.