दहिहंडीनिमित्त वाहतूक मार्गांत आज बदल

पुणे -शहरात मोठ्या प्रमाणावर साजऱ्या होणाऱ्या दहिहंडी उत्सवानिमित्त होणारी गर्दी विचारात घेता शनिवारी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. विशेषतः बुधवार चौक ते दत्तमंदिर चौकादरम्यान बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे सायंकाळी 5 वाजल्यापासून ते दहीहंडी फुटेपर्यंत पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

हे आहेत बदल
– शिवाजी रस्त्यावरून स्वारगेटकडे जाणाऱ्या पीएमपी बसेस शिवाजीनगर येथील स.गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्ता-टिळक रस्त्याने स्वारगेटकडे जातील.
– शिवाजी रस्त्यावरून पुणे स्टेशन, हडपसरकडे जाणाऱ्या बसेस जिजामाता चौकातून डावीकडे वळून फडके हौद दारुवाला पुलामार्गे इच्छितस्थळी जातील.
– स्वारगेटकडे जाणारी इतर हलकी वाहने आणि दुचाकी वाहने जिजामाता चौकातून डावीकडे वळून देवजीबाबा चौक – हमजेखान चौकामार्गे सरळ जातील.
– लक्ष्मी रस्त्यावरून बेलबाग चौकाकडे जाणारी सर्व वाहतूक सोन्या मारुती चौकाकडून उजवीकडे वळून पुढे फडके हौद चौक, जिजामाता चौक, बुधवार चौकामार्गे पुढे जातील.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.