पुणे ( Chandukaka Saraf Jewels’ wakad ) – ‘नाती आणि अखंडता’ ही चंदुकाका सराफ ज्वेल्सची समृद्ध परंपरा आहे. हा वारसा अधिक समृद्ध करण्यासाठी चंदुकाका सराफ ज्वेल्सच्या पुण्यातील वाकड येथे नव्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. उत्सव साडे तीन मुहूर्तांचा या कॅम्पेनच्या माध्यमातून चंदुकाका सराफ ज्वेल्सच्या वाकड शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा बुधवार 3 एप्रिल रोजी श्री. अतुल जिनदत्त शहा आणि सौ. संगीता अतुल शहा यांच्या हस्ते पार पडला. जी-55, ग्राउंड फ्लोअर, फिनिक्स मॉल ऑफ द मिलेनियम, वाकड, पुणे येथे या शाखेचा भव्य शुभारंभ झाला
गुढीपाडव्याच्या पवित्र मुहूर्ताच्या निमित्ताने सी.एस ज्वेल्सच्या वाकड शाखेचा भव्य शुभारंभ हा ग्राहकांसाठी नक्कीच आकर्षक ऑफर घेऊन येणारा आहे, यात शंका नाही.. गुढीपाडवा स्पेशल ऑफरमध्ये ४९ हजाराच्या व पुढील सोन्याच्या तसेच हिऱ्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर सोनं फ्री देण्यात येणार आहे आणि ५०० रुपयाचे गिफ्ट व्हाउचर हमखास भेट म्हणून देण्यात येईल. ही ऑफर 3 एप्रिल ते 8 एप्रिल पर्यंत मर्यादित असून ग्राहकांनी आजच वाकड शाखेला भेट द्यावी आणि आकर्षक ऑफर मिळवावी असे आवाहन करण्यात आले आहे. ( Chandukaka Saraf Jewels’ wakad )
चंदुकाका सराफ ज्वेल्स मध्ये हिऱ्यांच्या दागिन्यांवर 100% एक्सचेंज पॉलिसी दिली जाते . दागिन्यांच्या गुणवत्तेची हमी हाच त्यांचा विश्वास आहे. त्यालाच अनुसरून इंटरनॅशनल लॅब सर्टिफिकेट आणि लाईफटाईम रिपेयर सर्व्हिसही ग्राहकांना मिळणार आहे. या भव्य शोरूम मध्ये नवीन डिझाइन्स आणि आकर्षक दागिन्यांच्या अनेक व्हरायटी ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या शुभ मुहूर्तावर सोने खरेदी करून दागिन्यांच्या शॉपिंगचा मनमुराद आनंद लुटण्याची ही उत्तम संधी आहे.
नवनवीन सोन्याचे आणि हिऱ्यांचे दागिने या शुभ मुहूर्ताच्या निमित्ताने ग्राहकांना खरेदी करता येतील. तर आजच चंदुकाका सराफ ज्वेल्सच्या वाकड शाखेला नक्की भेट द्या आणि गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने खरेदी करून भाग्य उजळवा.सामाजिक बांधिलकी जपण्याची परंपरा निभावत वाकड येथील शाखेच्या शुभारंभा निमित्त चंदुकाका सराफ ज्वेल्सचे संचालक श्री. सिद्धार्थ शहा यांनी स्वर्णनगरी ओल्डएज होम्स सोशल वेल्फेअर फाउंडेशन बालेवाडी यांना देणगी देण्यात आली. ( Chandukaka Saraf Jewels’ wakad )