…तरीही चंद्रावर १ वर्ष संशोधन करणार चांद्रयान-2  

श्रीहरीकोटा – चंद्रावर अंतराळ उतरवण्याच्या महत्त्वाकांक्षी ‘चांद्रयान-2’मोहिमेचे “विक्रम’ लॅंडर चंद्रावर उतरवण्याच्या काही मिनिटे अगोदर काही तांत्रिक अडचणी आल्या. त्यामुळे “विक्रम’ लॅंडरकडून सिग्नल पाठवले जाणे थांबवले गेले. नियोजित वेळेच्या काही मिनिटे अगोदरपासून “विक्रम’ लॅंडरची स्थिती काय आहे, हे श्रीहरीकोटा येथील शास्त्रज्ञांना समजू शकले नव्हते.

चंद्राच्या केवळ २.१ किमी दूर असताना विक्रम लॅंडरचा संपर्क तुटल्याने शास्त्रज्ञ डेटा विश्लेषण करत आहेत. परंतु, चंद्राच्या कक्षेत अद्यापही चांद्रयान-२ उपस्थित असल्याची शक्यता आहे. यामुळे चांद्रयान- २ ऑर्बिट १ वर्ष पूर्ण चंद्रावर संशोधन करेल आणि अनेक रहस्य उलघडण्यास मदत करेल.

चांद्रयान-2 ऑर्बिटरचे वजन 2,379 किलो आहे. त्याचे आयुष्य 1 वर्षाचे आहे. संपूर्ण चांद्रयान-२ मोहिमेमध्ये या ऑर्बिटरने महत्वाची भूमिका निभावली आहे. या माध्यमातून विक्रम लॅंडर, प्रज्ञान रोव्हर आणि इस्रो वैज्ञानिक यांच्यात संपर्क साधला जाणार आहे. हे चंद्राच्या कक्षेत उपस्थित असेल. चांद्रयान -2 संपर्क तुटला असला तरी तो 95 टक्के पेलोड काम करीत आहे. म्हणजेच ऑर्बिटरची सर्व साधने कार्यरत आहेत.

दरम्यान, नियोजित वेळेपर्यंत ‘विक्रम’ लॅंडरचा प्रवास योग्य दिशेने झाला होता. मात्र, अखेरच्या मिनिटांमध्ये लॅंडरला काय अडचणी आल्या हे समजू न शकले नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.