हैदराबाद : सुधारीत नागरीकत्व कायद्याच्या विरोधात निदर्शने करण्यासाठी आलेले भिम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद रविवारी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना सोमवारी दिल्लीला पाठवून देण्यात आले.
हा हुकुमशाहीचा कळस झाला, असे ट्विट आझाद यांनी केले. आपल्या समर्थकांना प्रचंड मारहाण करण्यात आली असून मला दिल्ली पाठवून देण्यात येत आहे, असे त्यांनी त्यात नमूद केले आहे.
तेलंगणात हुकुमशाहीचा कळस झाला आहे. आधी आमच्या माणसांना लाठ्यांनी बदडण्यात आले. त्यानंतर मला अटक करण्यात आली. आता ते मला हैदराबाद विमानतळावर घेऊन आले आहेत. ते मला दिल्लीला रवाना करत आहेत,असे ट्विट आझाद यांनी केले आहे.
पुढील ट्विट त्यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कार्यालयाला टॅग करून केले आहे. त्यात ते म्हणातत, बहुजन समाज या अत्याचारांना कधीही विसरणार नाही. मी लवकरच परत येईन.
का कायद्याच्या विरोधात केलेल्या निदर्शनामुळे अलीकडेच जामीन मिळालेला या नेत्याला पुन्हा अटक करण्यात आली. यावेळ ती हैदराबादमध्ये करण्यात आली. या निदर्शनांना परवानगी नाकरली होती. त्यामुळे या नेत्याने तेथे जाऊ नये म्हणून त्यांना ताब्यात घेण्यात आले, असे पोलिसांनी म्हटले आहे.
हैदराबादच्या मेहदीपटनम भागातील क्रिस्टल गार्डन येथे होणाऱ्या निदर्शनांत सहभागी होण्यासाठी जात असताना हॉटेल बाहेर त्यांच्या समर्थकांसह त्यांना ताब्यात घेण्यात आले. सभेस परवानगी नसताना ते जात असल्याबद्दल त्यांच्यावर कलम 151 नुसार कारवाई करण्यातआली, असे पोलिसांनी सांगितले. मात्र रविवारी रात्री त्यांना कोठे ठेवण्यात आले, याबाबत माहिती मिळू शकली नाही.