मुंबई – नुकतेच ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचे पोस्टर सुबोध भावेने शेअर केले आहे. तर आज या चित्रपटातील अमृता खानविलकरचा लुक समोर आला आहे. सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे.
हा चित्रपट महाराष्ट्राचे आद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय इतिहासातील अनन्य साधारण व्यक्तिमत्व बाजीप्रभूंवर चित्रीत करण्यात आलेला आहे. आज या चित्रपटातील अमृता खानविलकरचा लुक समोर आला आहे.
दरम्यान, अभिमानाने मोठ्या पडदयावर ‘हर हर महादेव’ ही शिवगर्जना घुमणार ,पहिल्यांदाच मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड या ५ भाषांमधून, येत्या दिवाळीत 25 ऑक्टोबरपासून संपूर्ण देशात चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असल्याचे देखील यावेळी सुबोध भावेने आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केलं आहे. अभिजीत देशपांडेने या सिनेमाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे.
अमृताने तिच्या इंस्टाग्रामवर या चित्रपटातील तिचे पोस्टर शेअर करत पोस्ट लिहिली आहे की,’योद्ध्याची तलवार रणांगणात शत्रूवर तेव्हाच गर्जत असते जेव्हा त्यांची पत्नी मोठ्या अभिमानाने घर आणि अंगण सुशोभित करते..! असे लिहीत अमृताने तिच्या पात्राबाबत माहिती दिली आहे.
ती या चित्रपटामध्ये शूरवीर बाजीप्रभू देशपांडे यांना आयुष्यभर साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी सोनाबाई देशपांडे यांच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘हर हर महादेव’ हा अमृताचा पहिला ऐतिहासिक सिनेमा असुन ती पहिल्यांदाच ऐतिहासिक भूमिकेत दिसून येणार आहे.