मुंबई – अभिनेता शाहरुख खानचा आगामी जवान चित्रपट पुन्हा चर्चेत आला आहे. याआधी शाहरुखने चित्रपटातील आपला लूक रिव्हील करत सर्व चाहत्यांना धक्का दिला होता. आता शाहरुखने या चित्रपटाचे ३० दिवसांचे शूटिंग शेड्युल देखील पूर्ण केले आहे. याबातची माहिती स्वतः शाहरुखने ट्विट करत दिली.
‘जवान’ चित्रपटात शाहरुख खान व्यतिरिक्त साऊथ अभिनेत्री नयनतारा आणि विजय सेतुपती देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. नुकतेच शाहरुखने चेन्नईत चित्रपटाचे शेड्यूल पूर्ण केले आणि चाहत्यांनाही त्याबद्दल माहिती दिली. शाहरुख खानने ट्विट करून चित्रपटाशी संबंधित सर्वांचे आभार मानले आहेत. आणि आता चिकन 65 ची रेसिपी शिकायची गरज आहे असा खुलासाही त्याने केला.’चिकन 65′ ही चेन्नईची खास चिकन डिश आहे.चेन्नईत ३० दिवस शूटिंगसाठी घालवल्यानंतर शाहरुखने चिकन ६५ ची रेसिपी शिकण्याबाबत म्हंटले आहे.
Wot a 30 days blast RCE team! Thalaivar blessed our sets…saw movie with Nayanthara partied with @anirudhofficial deep discussions with @VijaySethuOffl & Thalapathy @actorvijay fed me delicious food.Thx @Atlee_dir & Priya for ur hospitality now need to learn Chicken 65 recipe!
— Shah Rukh Khan (@iamsrk) October 7, 2022
विशेष म्हणजे यावेळी शाहरुखने रजनीकांतपासून ते इतर साऊथ कलाकार भेटल्याचे देखील समोर आले आहे. शाहरुखच्या या पोस्टवर अनेकांनी त्याला अभिनयचं करत राहण्याचा सल्ला दिला आहे. तर काहींनी त्याला चेन्नईतील स्टारसोबत वेळ घालवण्यास सांगितले आहे. शाहरुख आगामी काळात पठाण,डंकी आणि जवान या चित्रपटात दिसणार आहे. ज्याची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत.