Tuesday, April 30, 2024

Chandrababu Naidu : आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांना जामीन मंजूर; काय असतील अटी-शर्ती?

Chandrababu Naidu : आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने (मंगळवार) आज कौशल्य विकास प्रकरणात राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि टीडीपी प्रमुख एन चंद्राबाबू नायडू यांना अंतरिम जामीन मंजूर केला.

अशात वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, हायकोर्टातील वकील सुंकारा कृष्णमूर्ती यांनी सांगितले की, ‘नायडू यांना चार आठवड्यांसाठी जामीन मंजूर करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांना कौशल्य विकास घोटाळ्यातील कथित सहभागासाठी राजमहेंद्रवरम मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते. त्यांनी यापूर्वी विजयवाडा एसीबी न्यायालयाच्या विशेष न्यायाधीशांना पत्र लिहून तुरुंगाच्या परिसरात आणि कडक सुरक्षा ठेवण्याची मागणी केली होती.’

नायडू यांनी 25 ऑक्टोबर रोजी तुरुंग प्रशासनामार्फत न्यायाधीशांना पत्र पाठवले होते. पत्रात, तेलगू देसम पार्टी (टीडीपी) प्रमुखाने अलीकडच्या काळात मध्यवर्ती कारागृहात आणि त्याच्या आजूबाजूला घडलेल्या काही अप्रिय घटनांबद्दल लिहिले, ज्यामुळे त्याचा जीव धोक्यात  असल्याचे देशील नमूद केले आहे. शिवाय, नायडू यांनी विनंती केली की कारागृहातील सुरक्षा व्यवस्था “Z+” पातळीशी प्रमाणे असावी.

आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने माजी मुख्यमंत्री आणि टीडीपी प्रमुख एन चंद्राबाबू नायडू यांना 24 नोव्हेंबरपर्यंत या अटी-शर्तीसह जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने त्याला 24 नोव्हेंबर रोजी आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले आहे. न्यायालय 10 नोव्हेंबर रोजी मुख्य जामीन याचिकेवर युक्तिवाद ऐकणार आहे. रुग्णालयात जाण्याशिवाय अन्य कोणत्याही कार्यक्रमात सहभागी घेऊ नये, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. उच्च न्यायालयाने चंद्राबाबू नायडू यांना मीडिया आणि राजकीय कार्यात भाग न घेण्याचे आदेश दिले आहेत.

शिफारस केलेल्या बातम्या

Next Post

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही