मुंबई – अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) अभिनयासह तिच्या फॅशनमुळे चांगलीच चर्चेत असते. आई झाल्यानंतर तिने अभिनय क्षेत्रातून काही काळ ब्रेक घेतल्याचे दिसते. मात्र सोशल मीडियावर ती सक्रिय असते. मुलगा वायुसोबतचे अनेक व्हिडिओ ती सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. सध्या सोनमचा रॅम्प वॉक करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यावरून सोनम दुसऱ्यांदा गरोदर असल्याची चर्चा रंगली आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये सोनमने पांढऱ्या रंगाचा लेहंगा घातला होता. लेहेंग्याला साजेल असे दागिनेही घातले होते. तसेच सोनमने न्यूड मेकअप केला होता. या लुकमध्ये ती फारच सुंदर दिसत होती. तब्बल चार वर्षांनंतर सोनम
रॅम्प वॉक करताना दिसली. एकीकडे तिच्या सुंदर लुकच काही जण कौतुक करत असताना काहींना सोनम गरोदर असल्याची शंका उपस्थित केली आहे. अनेकांनी कमेंट करत “ती गरोदर आहे का? ” असा सवाल केला आहे.
View this post on Instagram
दरम्यान, सोनमने नवीन घर खरेदी केले असून नवरात्रीच्या मुहुर्तावर ती नव्या घरात शिफ्ट झाली. या घरातील तिचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. हे फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले होते की, ‘या आठवड्यात आम्ही नवीन घरात शिफ्ट झालो. आम्ही खूप उत्साहात आहोत आणि या नवीन घरात आठवणी तयार करण्यासाठी आम्ही फार आतुर आहोत.’ या पोस्टनंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा ती रॅम्प वॉकच्या व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे.