नवी दिल्ली : आयसीआयसीआय बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. कारण कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना आर्थिक अन्वेषण विभागाने ( सीबीआय ) अटक केल्याची माहिती समोर येत आहे.
आयसीआयसीआय बँकेतील आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी सीबीआयकडून ही कारवाई करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. चंदा कोचर यांनी पती दीपक कोचर यांना फायदा मिळवून देण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे.
CBI has arrested former MD & CEO of ICICI bank Chanda Kochhar & Deepak Kochhar in the alleged ICICI bank – Videocon loan fraud case
(File Picture) pic.twitter.com/I7kmu09pjE
— ANI (@ANI) December 23, 2022
चंदा कोचर मुख्य कार्यकारी अधिकारी असताना आयसीआयसीआय बँकेने व्हिडीओकॉन समुहाला ३,२५० कोटी रुपयांचे कर्ज दिलं होतं. एप्रिल २०१२ मध्ये हे कर्ज देण्यात आले होते. यातील २,८१० कोटी रुपयांचे थकीत होते. २०१७ मध्ये हे बुडीत कर्ज म्हणून जाहीर करण्यात आले.
याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी ) चंदा कोचर आणि पती दीपक कोचर यांची चौकशी करत अटक केली होती. त्यानंतर चंदा कोचर आणि दीपक कोचर हे जामीनावर बाहेर होते. त्यातच आता सीबीआयने त्यांना अटक केली आहे.