- कर्जत-खालापूरमध्ये आढावा घेत समन्वयाने काम करण्याचा दिल्या सूचना
कर्जत : रायगड जिल्ह्यात नव्यानेच रूजू झालेले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी पहिल्यांदाच कर्जत-खालापूर तालुक्यातील आदिवासी बहूल भागाचा दौरा केला. जिल्ह्यातील ढसळलेली आरोग्य सेवा सुधारण्यासाठी पुढाकार घेतला. कर्जत-खालापूरमध्ये विशेष दौरा करत आढावा घेतला. गाव पातळीवर काम करणारे ग्रामसेवक, आशा वर्कर, अगंणवाडी सेविका व वैद्यकीय आधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करणण्याच्या सूचना केल्या.
कर्जतमध्ये लॉकडाऊन काळात गरोदर महिला व मुलांच्या आरोग्याची हेळसांड झाल्याची बाब पुढे आली. या पार्श्वभूमीवर “सीईओं’चा हा दौरा महत्वाचा होता. खालापूर तालुक्यातील हाळ येथील एक आदिवासी गरोदर महिलेला आरोग्य सेवा न मिळाल्यामुळे जीव गमवावा लागला होता, तर कर्जत तालुक्यात मार्च महिन्यापासून गरोदर महिलांना अपेक्षित आरोग्य सेवा मिळाली नव्हती, ही बाबसमोर आल्यानंतर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती सुधाकर घारे यांनी चौकशी करून कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते.
जिल्हा अधिकारी यांनी पण नुकताच फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला होता. त्यावेळी सुध्दा तालुक्यातील आरोग्य समस्याची माडंणी केली होती. या दौऱ्यावेळी खालापूर पंचायत समितीमध्ये सर्व आधिकाऱ्याचा आढावा घेतला, तर कर्जतमधील आदिवासी उपाय योजनेतील अबिवली प्राथमिक आरोग्य केंद्र, पिगंळस उपकेंद्र तसेच कळब प्राथमीक आरोग्य केंद्रास भेटी देत आधिकाऱ्याचा आढावा घेतला.
जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मंडलीक, कर्जत पंचायत समितीचे गटविकास आधिकारी बी. एस. पुरी, तालुका आरोग्य आधिकारी डॉ. सी. के. मोरे, एकात्मिक बालविकासचे प्रकल्प आधिकारी अनिकेत पालकर, आरोग्य अधिकारी कर्मचारी, महिला बालविकासच्या विस्तार आधिकारी, पर्यवेक्षिका, आरोग्य पर्यवेक्षिका आदी आधिकारी कर्मचारी उपस्थित होते.