मध्य रेल्वेचे “मिशन झिरो फेल्युअर’

पुणे -मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल यांनी लोणावळा-पुणे दरम्यानच्या भागाची शनिवारी पाहणी केली. यादरम्यान त्यांनी तांत्रिक बाबींसह पुणे विभागातील कामाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी “मिशन झिरो फेल्युअर’वर भर दिला असून, सुरक्षित प्रवास ही प्राथमिकता स्पष्ट केले.

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल यांनी लोणावळा-पुणे-लोणावळा रेल्वे मार्ग, ओएचई, रेल्वे पूल, सिग्नल प्रणाली आदी बाबींचे निरीक्षण केले असून, रेल्वे मार्गाच्या सुरक्षेचा आढावा घेतला. यावेळी विभागाच्या अपर व्यवस्थापक नीलम चंद्रा, प्रकाश उपाध्याय, सहर्ष बाजपेई, डीझेल शेडचे वरिष्ठ यांत्रिक अभियंता भालचंद्र मानकरे, उप मुख्य अभियंता (निर्माण) सचिन मुंगसे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

या दौऱ्यादरम्यान कंसल यांनी वृक्षारोपण केले असून, लोको परिचालन विभागाने करोनापासून वाचण्याच्या अनुषंगाने आणि यांत्रिक विभागाने डेमूच्या संचलनासंबंधित तयार केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन केले.

पुणे विभागातील घोरपडी येथील डीझेल लोको शेडचे आणि तेथील कामकाजाचे निरीक्षण केले. याशिवाय, नवे उच्च क्षमता कॉम्प्रेसरचे उद्‌घाटन केले. यानंतर त्यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधत, कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती घेतली.

यानंतर कंसल यांनी विभागाच्या शाखा अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत विभागात सुरू असणाऱ्या योजना, तांत्रिक कामे, प्रवासी सुविधा आणि सुरक्षेच्या अनुषंगाने सुरू असणाऱ्या बाबींचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी “मिशन झिरो फेल्युअर’वर भर दिला. नागरिकांचा सुरक्षित प्रवास ही प्राथमिकता असून, सुरक्षा आणि पायाभूत प्रवासी सुविधांवर विशेष लक्ष देणे गरजेचे असल्याचे नमूद केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.