नवी दिल्ली – कर विभागाने जारी केलेल्या माहितीनुसार 2023-24 या आर्थिक वर्षासाठीचे सुधारित कर संकलन उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. या आर्थिक वर्षामध्ये केंद्र सरकारने 34.37 लाख कोटी रुपयाचे कर संकलनाचे उद्दिष्ट ठरविले होते. तेवढा कर कमाल जमा झाला असल्याचे अधिकार्यांनी सांगितले. ( tax collection 2023-24)
अर्थव्यवस्था विस्तारात असतानाच कर विभागाने आणि अर्थमंत्रालयाने केलेल्या प्रयत्नामुळे कर संकलन वाढत आहे. यामुळे हे उद्दिष्ट पूर्ण झाले असल्याचे अधिकार्यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फब्रुवारी 2024 रोजी संसदेमध्ये दिलेल्या माहितीनुसार प्रत्यक्ष कर संकलनाचे उद्दिष्ट वाढवून 19.45 लाख कोटी रुपये करण्यात आले होते. तर अप्रत्यक्ष कर संकलनाचे उद्दिष्ट कमी करून 14.84 लाख कोटी रुपये करण्यात आले होते. या दोन्ही कराचे एकत्रित उद्दिष्ट 34.37 लाख कोटी रुपये करण्यात आले होते.
17 मार्च रोजी उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार प्रत्यक्ष कर संकलन 18.90 लाख कोटी रुपये इतके झाले आहे. एप्रिल 2023 मध्ये जीएसटी संकलन 1.87 लाख कोटी रुपये झाले होते. तर मार्च 2024 मध्ये जीएसटी संकलन 1.78 लाख कोटी रुपये झाले आहे. मात्र कर विभागाने सध्याच्या चालू आर्थिक वर्षाचे एकत्रित जीएसटी संकलन दिलेले नाही.
अर्थव्यवस्था विस्तारत असल्या नंतर जीएस कर संकलन वाढते. त्याचबरोबर करदात्यांना किमान त्रास होत कर भरता येणे शक्य झाले आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षापासून देशातील प्रत्यक्ष कर संकलना बरोबरच अप्रत्यक्ष कर संकलन वाढत असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.
यावर्षी बहुतांश पतमानांकन संस्थांनी भारताचा विकासदर 7.6% राहील असे म्हटले. हा जगातील सर्वात जास्त विकासदर आहे. त्या प्रमाणात कर संकलन वाढणे अपेक्षित आहे. केंद्र सरकारने आतापर्यंत भांडवली गुंतवणूक करून अर्थव्यवस्थेला आधार दिला होता. आता खासगी क्षेत्रातूनही भांडवली गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत तिसर्या तिमाहित भारताचा विकास दर 8.4% इतका नोंदला गेला आहे.