केंद्र सरकारची स्टार्टअप्‌सना मदत -पियुष गोयल

नवी दिल्ली – केंद्र सरकार देशात नवे उद्योग वाढावे यासाठी प्रयत्न करीत आहे. या वर्षात आतापर्यंत 37 स्टार्टअप्‌सना निधी पुरविण्यात आलेला आहे. गेल्या वर्षी 98 स्टार्टअप्‌सना निधी पुरविण्यात आला होता. ही माहिती वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी राज्यसभेत दिली.

नवे ई- कॉमर्स धोरण तयार झाले असून त्यावर संबंधिताकडून सूचना मागविण्यात आल्या आहे. त्याचबरोबर विविध मंत्रालये या नव्या धोरणाच्या मसुद्याचा अभ्यास करीत आहेत. आठवडा अखेर हे धोरण जाहीर होईल असे त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.