सदू शिंदे क्रिकेट स्पर्धा : मुस्लीम बॅंकेचा दणदणीत विजय

पुणे – मुस्लीम बॅंकेने कॉसमॉस बॅंकेचा सहा गडी राखून पराभव केला आणि सदू शिंदे क्रिकेट स्पर्धेत आव्हान राखले. ही स्पर्धा पुणे जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित करण्यात आली आहे.

प्रथम फलंदाजी करताना कॉसमॉस बॅंकेच्या फलंदाजांनी निराशाजनक खेळ केला. मुस्लीम बॅंकेच्या सर्फराज शेख व शुभम शुक्‍ला यांच्या भेदक माऱ्यापुढे त्यांच्या फलंदाजांची दाणादाण उडाली. सर्फराजने 19 धाबांमध्ये तीन गडी बाद केले. शुक्‍ला याने केवळ 10 धावांमध्ये तीन विकेट्‌स घेतल्या. अख्तर शेख व युवराज मोरे यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. कॉसमॉस बॅंकेच्या वैनतेय पुरंदरे (27) व प्रसाद घोगरे (10) या दोनच फलंदाजांना दोन आकडी धावा करता आल्या. कॉसमॉस बॅंकेचा डाव 17 षटकांमध्ये 69 धावांमध्ये कोसळला.

मुस्लीम बॅंकेने विजयासाठी असलेले आव्हान केवळ नऊ षटकात पार केले. त्यामध्ये हेमंत पवार याने दमदार खेळ करीत 30 धावा केल्या व महत्त्वाचा वाटा उचलला. किरण नवगिरे याने नाबाद 23 धावा केल्या. कॉसमॉस बॅंकेच्या प्रसाद घोगरे याने दोन विकेट्‌स घेतल्या. राकेश गायकवाड व नवनाथ पारखे यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक –

कॉसमॉस बॅंक 17 षटकात सर्वबाद 69 ( वैनतेय पुरंदरे 27, प्रसाद घोगरे 10, सर्फराज शेख 3-19, शुभम शुक्‍ला 3-10, अख्तर शेख 1-17, युवराज मोरे 1-8) मुस्लीम बॅंक 9 षटकात 4 बाद 72 (हेमंत पवार 30, किरण नवगिरे नाबाद 23, प्रसाद घोगरे 2-12, राकेश गायकवाड 1-5, नवनाथ पारखे 1/11)

Leave A Reply

Your email address will not be published.