मांजरी – मांजरी बुद्रुक परिसरातील उत्तर भारतीयांनी येथील मुळा- मुठा नदीतीरी बुधवारी (१० नोव्हेंबर) सायंकाळी मावळत्या सूर्याला अर्घ्य देत छठ पूजा उत्साहात साजरी करण्यात आली. मांजरी बुद्रुक येथील माजी उपसरपंच अमित आबा घुले यांनी नदीतीरी पूजेसाठी घाटाची व्यवस्था केल्याने उत्तर भारतीयांनी त्यांचे आभार मानून समाधान व्यक्त केले.
या पूजेसाठी मांजरी बुद्रुक व विशेषकरून मांजरी – केशवनगर या परीसरातील उत्तर भारतीयांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होते. छठ पूजेसाठी महिला व्रत पाळतात. या पूजेसाठी नदी तीरी घाट बांधून याठिकाणी लाईटची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय घाटाच्या टोकाला पाण्याचे तळेही अमित आबा घुले आणि त्यांच्या मित्र परिवाराने तयार केले आहे.
या पाण्यात उभे राहून मावळत्या सूर्याला अर्घ्य देण्यात आले. तसेच नैवेद्य दाखवून पूजा केली यासाठी उसाच्या मंडपाचे यापूजेला महत्त्व असल्याने त्यासाठी महिलांनी पाण्यात ऊस उभे करून सुपातील नैवद्य सूर्याला अर्पण केला. मांजरी बुद्रुक, महादेवनगर, झेड कॉर्नर, म्हसोबा वस्ती, घावटे वस्ती, केशवनगर परिसरातील उत्तर भारतीयांची उपस्थिती होती.
हिंदू धर्मातील विविध सणवार यांना जेवढे महत्व प्राप्त आहे. तेवढेच महत्व उत्तर भारतीयांच्या या छठ पूजेला आहे. याठिकाणी आपण समाजसेवा किंवा प्रतिनिधित्व करत असताना याही लोकांना पूजेसाठी चांगला घाट व सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात या भावनेतून येथे छठ पूजेची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी उत्तर भारतीय नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
अमितआबा घुले (माजी उपसरपंच, मांजरी बुद्रुक ग्रामपंचायत)