नवी दिल्ली : ख्रिसमस संपल्यानंतर आता नव्या वर्षाच्या स्वागताची जोरदार तयारी सर्वत्र सुरु आहे. दरम्यान रझा अकादमीने मुस्लीम तरुणांना नवीन वर्ष साजरे न करण्याचे आवाहन केले आहे. नववर्ष साजरं करणं ‘हराम’ असल्याचे खळबळजनक वक्तव्य रझा अकादमीच्या अध्यक्ष सईदी नुरी यांनी केले आहे.
नुरी यांनी तरुणांना नववर्षाच्या पार्टीचे आयोजन किंवा सेलिब्रेशन करु नका असे आवाहन केले आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री होणाऱ्या पार्टींमध्ये केल्या जाणार्या ‘अश्लील कृत्यांमुळे’ सैतानालाही लाज वाटू शकते असा दावाही त्यांनी केला. नुरी यांनी ट्विटरला एक व्हिडीओ शेअर केला आहे.
Muslim naujawan 31st Night ke khurafat se mafooz raheiñ Raza Academy ki appeal.
مسلم نوجوان تھرٹی فرسٹ نائٹ کے خرافات سے محفوظ رہیں رضا اکیڈمی کی اپیل.
31 दिसंबर की रात को उत्सव के नाम पर जौ खुराफात और फहष हरकतें होती हैं वह नाजाऐज़ व हराम हैं।#RazaAcademy pic.twitter.com/WY4gJ0wOaW
— Raza Academy (@razaacademyho) December 29, 2022
या व्हिडीओमध्ये रझा अकादमीचे अध्यक्ष सईद नुरी,“वर्षाची शेवटची रात्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ३१ डिसेंबरला निर्लज्जपणाची हद्द ओलांडली जाते हे खेदजनक आहे. अशा पार्ट्यांमध्ये सेलिब्रेशनच्या नावाखाली कोणते अशोभनीय कृत्य केलं जात नाही. अशा वाईट कृत्यांमुळे सैतानालाही लाज वाटेल. अशा हराम प्रथा सर्व धर्माचे आणि जातीचे लोक करतात आणि विशेषत: मुस्लिम तरुण अशा हराम क्रियांमध्ये फार रस घेतात”, असे म्हणताना दिसत आहेत.
सईद नुरी यांनी मुस्लीम पालकांना आपल्या मुलांची निर्लज्ज कृत्यांमधून सुटका करण्याचं आवाहन केलं असून अशा पार्ट्यांमध्ये सहभागी होण्यापासून रोखण्यास सांगितलं आहे. “आपल्या मुलांना अशा अनैतिक कृत्य आणि निर्लज्जपणात सहभागी होण्यापासून रोखण्यासाठी आपल्याकडे अजूनही वेळ आहे. आपण त्यांना अशा सेलिब्रेनमध्ये जाण्यापासून रोखले पाहिजे”, असे ते म्हणाले आहेत. दुसऱ्या एका ट्वीटमध्ये रझा अकादमीने मुस्लिमांना नववर्षाच्या नावाखाली अश्लील कार्यक्रमांचे आयोजन करण्यापेक्षा प्रार्थना आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यास सांगितले आहे.