सोमेश्वरवाडी : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनाच्या पूर्व संध्येला माजी नगरसेवक सनी उर्फ चंद्रशेखर विनायक निम्हण यांच्या संकल्पनेतून सोमेश्वर देवस्थान सोमेश्वरवाडी पाषाण, विठ्ठल सेवा मंडळच्या आणि श्री शिवशंभु चारिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात 809 रक्तदात्यांनी रक्तदान करत शिवराज्याभिषेक दिन अभिनव पध्दतीने साजरा केला.
“शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्यसाधत परिसरातील तरुणांनी समाजाचे ऋण फेडण्यासाठी, निरोगी समाजासाठी, शिवविचारांना जागत, मोठ्या प्रमाणात सर्वांनी येऊन रक्तदान करत एक अभिनव उपक्रम साजरा केला. येणाऱ्या पुढील काळात देखील वेगवेगळ्या समाजोपयोगी कार्यक्रम आपण राबविणार आहोत.”
– सनी निम्हण
सोमेश्वर देवस्थान विश्वस्त पोपटराव जाधव, कै. बाळोबा सुतार दिंडीचे अध्यक्ष खंडू अरगडे, माजी महापौर दत्तात्रय गायकवाड, औंध गाव विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष योगेश जुनवणे, भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर, राहुल कोकाटे, प्रल्हाद सायकर, प्रकाश बालवडकर, रमेश ठोसर, संजय निम्हण, संजय बालवडकर, गोविंद रणपिसे, मोरेश्वर बालवडकर, बालम सुतार, योगेश सुतार, रुपेश जुनवणे, मुन्ना शिंदे, सुप्रीम चोंधे आणि परिसरातील सांप्रदायिक क्षेत्रातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.