अबुजा – नायजेरियाच्या ओंडो राज्यातील एका कॅथोलिक चर्चवर रविवारी काही बंदुकधाऱ्यांनी सामूहिक हल्ला केल्याने त्यात महिला आणि मुलांसह किमान 50 लोक ठार झाले असल्याचे वृत्त आहे. डेली सबा ने वृत्त दिले आहे की हा हल्ला ओंडो राज्यातील ओवो शहरात झाला, रविवारी सकाळच्या प्रार्थनेसाठी बरेच उपासक तेथे जमलेले असतानाच हा हल्ला केला गेला.
बंदुकधाऱ्यांनी प्रथम चर्चच्या फाटकाजवळ स्फोट केला आणि नंतर अंदाधुंद गोळीबार केला. या घटनेतील मृतांचा आकडा 50 पेक्षा अधिक असू शकतो अशी भीती एका अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे. ओंडू राज्याचे गव्हर्नर अरकुनरिन अकेरेडोलू यांनी निवेदनात हल्ल्याची पुष्टी केली आहे. या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही संघटनेने घेतलेली नाही.
हल्ल्याचा हेतुही स्पष्ट झालेला नाही.रविवारी संध्याकाळी एका निवेदनात पोलिसांनी सांगितले की, सकाळी 11:30 च्या सुमारास बंदुकधाऱ्यांनी चर्चच्या बाहेरून उपासकांवर गोळ्या झाडल्या तर इतर बंदूकधाऱ्यांनी इमारतीच्या आत असलेल्या लोकांना लक्ष्य केले.