यंदा दिवाळी ‘या’ गोड पदार्थांनी करा साजरी

आपल्याकडे प्रत्येक सणाला विशिष्ट पदार्थाचे महत्त्व असते. जसे गणपतीला उकडीचे मोदक, नवरात्रात देवीला पुरण खीर, दसरा दिवाळीला विविध पक्वान्न इत्यादी गोष्टींना शास्त्रीय आधार आहेच आणि परंपरासुद्धा आहे. सणाचं निमित्त पुढं करून सगळेच मिठाईवर ताव मारतात आणि डाएटचं नियोजन सोयीस्करपणे विसरलं जातं, तर आज जाणून घेऊ या काही रुचकर आणि पौष्टिक गोड पदार्थाबाबत…

गाजराचा हलवा
गोडाचा हा पदार्थ बहुतांश जणांचा आवडता असतो. गाजराच्या हलव्यात कॅलरींचं प्रमाण कमी असतं. गाजर बिटेकारोटिनचा उत्तम स्रोत आहे. त्वचा तजेलदार ठेवण्यासाठी आणि डोळ्यांचं आरोग्य राखण्यासाठी गाजर खाणं गरजेचं आहे.

खीर
दुधामुळे शरीराला कॅल्शियम आणि ब जीवनसत्त्व मिळतं. तांदूळ हा कर्बोदकांचा उत्तम स्रोत असून, शरीराला ब जीवनसत्त्व मिळवून देतो. म्हणूनच खीर हा ऊर्जादायी पदार्थ ठरतो.

 

खजूर-नारळ लाडू
पोटॅशिअम, मॅग्नेशियम, कॅल्शिअम या साऱ्या सत्त्वांचा उत्तम स्रोत म्हणजे खजूर. खजूर खाणं शरीरासाठी अत्यंत उपयुक्त ठरतं. नारळात असलेली जीवनसत्त्वं, खनिजं आणि फायबर सर्व अंतर्गत क्रिया नीट पार पाडण्यास मदत करतात. खजूर-नारळ लाडू हा हटके आणि पौष्टिक पदार्थ आहे.

अननस-अक्रोड श्रीखंड
अननसमधून क जीवनसत्त्व मिळतं. पूर्ण पिकलेलं अननस वापरल्यास साखर कमी घालावी लागते. पचनक्रिया योग्य रीतीनं पार पाडण्यासही अननस मदत करतं. प्रथिनयुक्त योगर्ट शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवतं आणि एक प्रकारचा थंडावा देतं.

ड्रायफ्रुट शिकंजी
दुधामुळे शरीराला कॅल्शियम आणि ड्रायफ्रुटमुळे बी १२ जीवनसत्त्व मिळतं. म्हणूनच ड्रायफ्रुट शिकंजी हा ऊर्जादायी पदार्थ ठरतो.


Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)