मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज दोन तासांचा “ब्लॉक

पुणे – पुणे प्रादेशिक विभागाच्या महामार्ग सुरक्षा पथकाकडून मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग दि. 23 रोजी (बुधवार) दोन तासांसाठी “ब्लॉक’ करण्यात येणार आहे. दुपारी 12 ते 2 या कालावधीत द्रुतगती मार्गाने मुंबईकडून पुण्याकडे येणारी वाहतूक वळवण्यात येणार आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून द्रुतगती मार्गावरील पुणे लेनवर “82.000 किमी’ या ठिकाणी “ओव्हर हेड गॅंन्ट्री’ बसवण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकडून पुण्याकडे येणारी अवजड आणि मालवाहतूक करणारी वाहने खालापूर आणि कुसगाव टोलनाक्‍याच्या अलीकडे “52.500 किमी’ या ठिकाणी थांबवण्यात येणार आहेत.

तर हलकी चारचाकी आणि इतर प्रवासी वाहने द्रुतगती मार्गावरील कुसगाव टोलनाका येथून जुन्या मुंबई-पुणे महामार्गाने (एनएच 04) पुण्याकडे वळवण्यात येणार आहेत. या मार्गावरील चालक आणि प्रवाशांनी महामार्ग पोलिसांना सहकार्य करावे, असे मोहिते यांनी नमूद केले.

Leave A Reply

Your email address will not be published.