मुंबई – जगभरात करोनाने घेतलेल्या बळींची संख्या 70 हजारांवर पोहचली आहे. त्या विषाणूमुळे जीव गमवाव्या लागलेल्यांत एकट्या युरोप खंडातील हजारांहून अधिक रूग्ण आहेत. सर्वप्रथम चीनमध्ये करोनाचा उद्रेक झाला. त्या देशाला ठप्प करणाऱ्या करोनाने आता जवळपास संपूर्ण जगालाच विळखा घातल्याचे चित्र आहे. जगभरातील 209 देश आणि प्रदेशांमध्ये त्या विषाणूचा फैलाव झाला आहे.यातच भारतातही लॉकडाउन आहे.
याच पार्श्वभूमीवर कोरोना साथीच्या नँशनल लॉकडाऊनमुळे यावर्षीची 14 एप्रिलची आंबेडकर जयंती ही आपआपल्या घरातच साजरा करा, असं आवाहन बाबासाहेबांचे वारसदार आणि वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. त्यामुळे गुढीपाडवा, रामनवमीप्रमाणे आता आंबेडकर जयंतीदेखील रद्द करण्यात आली आहे.
नँशनल लॉकडाऊन 14 एप्रिलच्या आधी संपत असल्याने काही आंबेडकरी अनुयायांनी आंबेडकर जयंती सार्वजनिकरित्या साजरी करण्याचं योजिलं होतं. पण महाराष्ट्रातला व्हायरसचा वाढता प्रसार पाहता आंबेडकरी अनुयायांनी जयंतीच्या नावाखाली अजिबात घराबाहेर पडू नये, असंही आंबेडकर म्हणालेत.