कॉंग्रेसच्या ‘संकटमोचका’ला सीबीआयकडून ‘समन्स’

बंगळूर – कॉंग्रेसचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे त्या पक्षाचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष डी.के.शिवकुमार यांना सीबीआयने चौकशीसाठी समन्स बजावले आहे. शिवकुमार आणि त्यांच्या कुटूंबीयांवर सुमारे 75 कोटी रूपयांची बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा आरोप आहे.

सीबीआयने शिवकुमार यांना 23 नोव्हेंबरला हजर राहण्यास सांगितले. मात्र, पूर्वनियोजित दौऱ्यामुळे त्यांनी 25 नोव्हेंबरला हजर राहण्याची तयारी दर्शवली. संबंधित प्रकरणात सीबीआयने याआधीच शिवकुमार आणि त्यांच्या कुटूंबीयांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

त्याप्रकरणी सीबीआयने मागील महिन्यात शिवकुमार यांच्याशी संबंधित कर्नाटकबरोबरच मुंबई आणि दिल्लीतील ठिकाणांवर छापे टाकले. त्या छाप्यांवेळी 57 लाख रूपयांची रोकड जप्त करण्यात आली. त्याशिवाय, मालमत्ता आणि बॅंक माहितीशी निगडीत काही कागदपत्रेही हस्तगत करण्यात आली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.