मुंबई: मागील १५ दिवसानापासून सुरु असलेला सत्तेचा तिढा सोडण्याच्या हालचालींना आता वेग आला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भाजपाला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित केले आहे. त्यानंतर भाजपच्या कोर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. पहिली बैठक संपल्यानंतर पुन्हा एका तासाच्या अंतराने दुसरी बिठाक बोलावी होती.
या दुसऱ्या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंग द्वारे मार्गदर्शन केले असल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकी नंतर काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या कोर कमिटीतील महत्वाच्या नेत्यांचा ताफा राज्यपालांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत.
राज्यपालांच्या भेटीनंतर मोठा सत्ता स्थापनेसंदर्भात मोठा निर्णय जाहीर होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मुख्यमंतरी राजभवनात गेल्यानंतर काही वेळातच लगेच पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे.
सविस्तर वृत्त लवकरच…